Showing posts with label S-रोशन सातारकर. Show all posts
Showing posts with label S-रोशन सातारकर. Show all posts

राया मी रंभा की,Raya Mi Rambha Ki

चंद्रकलेची घडी मोडली, सांगा हो दिसते कशी ?
राया मी रंभा की उर्वशी ?

अवखळ चंचल माझे यौवन
अंगावरती आले बहरून
अर्ध्याराती उरात माझ्या होई कासाविशी
राया मी रंभा की उर्वशी ?

दुनियेत साऱ्या माझ्यावानी
गावंल का हो दुसरं कोनी
चुकुन पडलं तुमच्या हाती सोनं बावनकशी
राया मी रंभा की उर्वशी ?

मनासारखं माझ्या घडु द्या
जळतिल त्यांना खुशाल जळु द्या
नजरेमधला भाव निराळा तुम्हांस दावू कशी ?
राया मी रंभा की उर्वशी ?

येऊ कशी तशी मी,Yeu Kashi Tashi Mi

नेहमीच राया तुमची घाई
नका लावू गठुडं बांधायला
येऊ कशी तशी मी नांदायला हो,
येऊ कशी तशी मी नांदायला

सण वर्षाचा आहे दिवाळी
आज ऱ्हावू जाऊ उद्या सकाळी
जेवन करते पुरणाची पोळी
भात मी घातलाय रांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

गाव हाय आपलं बारा कोसं
डोकं तुमचं असं वो कसं ?
उन्हतान्हात चालण्याचं त्रास
दिल्याति चपल्या सांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

बाबा गेले हो परगावा
निरोप त्यांचा घ्यायाला हवा
नाही विचारलं थोरल्या भावा
आई गेली पाणी शेंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

तुम्हाला सजना सांगत्ये ऐका
चालावू नका तुमचा हेका
तुम्हीच सांगा हे बरं हाय का
श्रावण लागलाय सुंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

मला म्हणत्यात हो,Mala Mhanatyat Ho

एक पावना कुठून तरी आला
भुलला माझ्या गोऱ्या रंगाला
मी म्हनलं करू नगंस थाट
अशि लावली मी कैकांची वाट
मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, दैना, दैना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना

माझ्या गालावर पडते खळी, पडते खळी
नाक माझं बाई चाफेकळी, चाफेकळी
मला बघुन लाजतोय ऐना, ऐना, ऐना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना

गोरा गोरा सुंदर माझा चेहरा
बटांची नागीन देता पहारा
माझा पदर डोईवर राहिना, राहिना, राहिना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना

तो पावणा सारखाच बघतोय् ग बघतोय्
कसा गर्दीत खेटून चालतोय ग चालतोय्
येतो मागून; पुढं काही जाईना, जाईना, जाईना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना



पैठणचा शालू आज मला,Paithanacha Shalu Aaj Mala

पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज !

मोरपंखी नवा जरतारी, सूत असावं शंभर नंबरी
पक्क्या रंगाचा तो नऊवारी, तुम्ही आणा मला कारभारी
लांबीरुंदी बघुनी घ्यावी पदरावरचा साज, साज, साज
पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज !

तुम्ही गुणाचं हाय कारभारी, जीव माझा ह्यो तुमच्यावरी
ओढ लागली ही आज न्यारी ग बाई ओढ लागली ही आज न्यारी
करा तयारी निघा लवकरी कुठवर सांगु रोज, रोज, रोज
पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज !

हौस माझी पुरवा धनी, बाईल तुमची मी देखणी
ह्या चंद्राची ही चांदणी तुम्हा सांगते हो विनवुनी
आणत्याल शालू गोड गोड बोलू करू मनाचं राजं, राजं, राजं
पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज !

डार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस Darling Darling Kay Mhantos

डार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस ?

अरे भलताच बाईल येडा दिसतोस !



रूप बावळं झिपरं केस

हिप्पीवानी सारा वेष

घर ना दार

भुईला भार


घरावर चकरा काय मारतोस ?



दारु-मटक्याचा नाद तुला

चोरीचीही ठाव कला

पत्त्याचा इमला

तुला ना जमला

महालाची बात आता काय करतोस ?



नार मी मोठ्या घरची रं

बापही माझा पाटील रं


साधुन मोका

मारतोस धक्का

हातात इस्तव काय धरतोस ?