मनोगतांचे उंच मनोरे,Manogatanche Unch Manore

मनोगतांचे उंच मनोरे सांग कुणी रचिले
आज लोचनी संसाराचे स्वप्न मला दिसले

ही वळणाची वाट असावी हिरव्या कुरणावरी
फुलझांडावर रोज उडाव्या कारंजाच्या सरी
उभे मधोमध एक सानुले घरकुल माझे वसले

सखा सोबती जवळ बसावा एकांती येऊनी
अंग चोरुनी दूर उभी मी बावरलेल्या मनी
या भेटीच्या आभासाने खुदकन मी हसले

या चित्राचे रंग भरावे तूच आपल्या हाती
याच घडीला अशा जुळाव्या अपुल्या रेशीम गाठी
माझ्या पुढती इंद्रपुरीचे सुख कोठे कसले



No comments:

Post a Comment