राया मला जवळी घ्या ना,Raya Mala Javali Ghya Na

तुमच्यावरती मीच भाळले, घडला माझा गुन्हा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

नेसले आजला शालु हिरवा नवा
सहवास राजसा तुमचा मजला हवा
रात चांदणी मोत्यावाणी, येळ चालला सुना
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

घ्या विडा केशरी माझ्या हातातुनी
ऐन्यात पाहते मुखडा न्याहाळुनी
तुमच्या हाती हात गुंफिता, मदन करितो खुणा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

स्वभाव तुमचा ठसला माझ्या मनी
मज आवडते ही संगत तुमची धनी
राघु संगे मैना लाडकी, मलाच तुमची म्हणा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

No comments:

Post a Comment