Showing posts with label S-सुलोचना चव्हाण. Show all posts
Showing posts with label S-सुलोचना चव्हाण. Show all posts

जन्मोजन्मीं तुम्हीच JANMOJANMI TUMHICH

जन्मोजन्मीं तुम्हीच यावे माझ्या संसारी
एकच आशा सदैव राहील अखेरची ह्या उरी

अलंकार सोन्याचे मजला नकोत माणिकमोती
शपथ गळ्याची तुमच्या घ्यावी माझी पूरी कसोटी
महालात जन्मले, वाढले वैभवात मी जरी

मंगल सौभाग्याचा ठेवा तुमच्या चरणांमधी
अखंड वाहील प्रीतीची का निर्मळ गंगा मधी
युगायुगांच्या गाठीभेटी पडतील वरचेवरी


Lyrics -अनिल भारती ANIL BHARATI
Music -वसंत प्रभू VASANT PABHU
Singer -सुलोचना चव्हाण  SULOCHANA CHAVHAN

धनी तुमचा नि माझा Dhani Tumcha Ni Mazha- Sulochana Chavan (Rangalya Ratri Asha)



धनी तुमचा नि माझा
तरुणपणाचं कौतुक म्हणुनी किती नटू मी किती नटू
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू

करा थाट तुम्ही सरदारी
अशी बशीन तुमच्या शेजारी
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू

राजा-राणीला चौकट कसली
मैना राघुच्या पिंजर्‍यात बसली
मैना गाईल गीत प्रीतिचे पोपट ’विठू विठू’
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू

Lyrics - Jagdish Khebudkar
गीत    -    जगदीश खेबूडकर
Music - Vasant Pawar
संगीत     -     वसंत पवार
Singer - Sulochana Chavan
स्वर    -     सुलोचना चव्हाण
Movie - Rangalya Ratri Asha
चित्रपट    -    रंगल्या रात्री अशा

सोळावं वरीस धोक्याचं,Solava Varis Dhokyacha

तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं
अन्‌ सोळावं वरीस धोक्याचं ग सोळावं वरीस धोक्याचं

पिसाट वारा मदनाचा, पतंग उडवी पदराचा
तोल सुटावा अशी वेळ ही, तरी चालणं ठेक्याचं

रात रुपेरी फुलली ग, मला पौर्णिमा भुलली ग
अंगावरती सांडु लागलं, टिपूर चांदणं रूप्याचं

ओढ लागली संगतीची, नजरभेटिच्या गमतीची
आज मला हे गुपीत कळलं, जत्रेमधल्या धक्क्याचं

सखे बाई ग येण्याचा,Sakhe Bai Ga Yenyacha

कुठवर पाहु वाट सख्याची,
माथ्यावर चंद्र की ग ढळला !
सखे बाई ग, येण्याचा वखत की ग टळला !

घाईघाईनं इकडे येत असेल मजकडे
कुणा ग सटवाईचा, सवतीचा निरोप कळला आधी
सखे बाई ग दिली थाप मजलागि,
येण्याचा वखत की ग टळला !

तळहात धरून भरविली साय
होई आता हाय हाय !
सभोवताली जाळ केली माझी राळ
सखे बाई ग जीव तळमळे
येण्याचा वखत की ग टळला !

लई बाई लबाड दिसतोय ग,Lai Bai Labbad Disatoy Ga

माझ्याकडं बघून, डोळा बारीक करून
पाहुणा गालात हसतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

उगाच मिशिला देतुया पीळ,
तोंडानं हलकेच घालतुया शीळ
पुन्हा पुन्हा बघुन, छाती पुढे काढून,
उगाच ऐटीत चालतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

सकाळच्या पारी पाण्याला जाता
उभा राहून ग रोखतुया वाटा
जरतारी फेटा बांधुन मोठा
रुबाब अपुला दावतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

पाण्यानं भरुन घेता ग घागर
हिसळून पाणी भिजतुया पदर
मदनाचा बोका घेतुया झोका
मलाच कोड्यात घालतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

राया मला जवळी घ्या ना,Raya Mala Javali Ghya Na

तुमच्यावरती मीच भाळले, घडला माझा गुन्हा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

नेसले आजला शालु हिरवा नवा
सहवास राजसा तुमचा मजला हवा
रात चांदणी मोत्यावाणी, येळ चालला सुना
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

घ्या विडा केशरी माझ्या हातातुनी
ऐन्यात पाहते मुखडा न्याहाळुनी
तुमच्या हाती हात गुंफिता, मदन करितो खुणा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

स्वभाव तुमचा ठसला माझ्या मनी
मज आवडते ही संगत तुमची धनी
राघु संगे मैना लाडकी, मलाच तुमची म्हणा
अन्‌ राया मला जवळी घ्या ना पुन्हा !

राजसा घ्यावा गोविंद विडा,Rajasa Ghyava Govind Vida

ही नव्या नवतीची खुडून कवळी पानं
लावला ज्वानीचा चुना मधल्या बोटानं
ही चिकणी सुपारी फोडली चिमण्या दातानं
अन्‌ डाव्या डोळ्यानं खुडून घातला;
नजर काताचा हो खडा
राजसा घ्यावा गोविंद विडा

विडा घेऊनी अलगद हाती
हात अदबीनं केला पुढती
हिरवा शालू हिरवी चोळी
भरला हिरवा चुडा

या विड्याचा रंग गुलाबी
धुंद करील ही नशा शराबी
याच नशेचा तुमच्यासाठी
भरून आणला घडा

नाचनाचुनी होता दंग
अर्ध्या रात्री येईल रंग
तुमच्यावरती उधळीन राया
शिणगाराचा सडा

मी बया पडलिया भिडंची,Mi Baya Padaliya Bhidachi

मी बया पडलिया भिडंची
गाव हे हाय टग्यांचं !

जो तो येतोय मला खुणावतोय
कुणाच्या मागून जायाचं !

गाणं म्हणण्याचा माझा धंदा
होणार न्हाई कधीच वांदा
जे मनात हाय ते जमायचं न्हाय
सांगा उघड कशाला बोलायचं !

म्हाईत हाय का माझं नाव
कोल्हापूर बाई माझं गाव
न्हाई देणं घेणं फुकाटचंदी लावून येणं
तुमचं आमचं कसं जमायचं !

मला हो म्हणतात लवंगि,Mala Ho Mhanatat Lavangi

नाव-गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापुरची
मला हो म्हणतात लवंगि मिरची

हा डौल झोक हा नटारंगीचा ढंग
वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग
हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा, झाकुनी फेकिन नजरेची बरची

हा लाल डाळिंबी शालु पदर जरतारी
ही हिरवी-हिरवी चोळी तंग भरदारी
नका पाहू न्याहाळुन अशी, पडाल तुम्ही फशी, जणु मी नागीन झाडावरची

या तिखटपणावर जाउ नका हुळहुळून
घायाळ शिकारी हरिणी जाइल पळुन
हिरव्या रानात दिसते उठून, नका घेउ खुडुन, अहो मी पाव्हणी बारा घरची



मला हवा ग असाच,Mala Hava Ga Asach

मला हवा ग असाच संसार हवा
गोड गोड खाया आणि बघाया, रोज सिनेमा नवा नवा
मला हवा ग असाच संसार हवा

अशी मिळावी सासू भांडी लागंल घासू
नवरा लई विश्वासू माझं पुशिल आसू
रुबाब माझा बघून राजा विसावा देईल जवातवा
मला हवा ग असाच संसार हवा

मानाची मोठी जावं जर खेळेल डाव
इलाज मजला ठावं नाही देणार भाव
नव्या युगाचा तो धोक्याचा दाविन तिजला दिवा दिवा
मला हवा ग असाच संसार हवा

वैभव माझं मोठं कुणि लाविल बोटं
धन्याला सांगून खोटं कुणि फुगविल पोट
भर रस्त्याला गाठून त्याला चांगलाच देईन दवा दवा
मला हवा ग असाच संसार हवा

बाई मी मुलखाची लाजरी,Bai Mi Mulakhachi Lajari

कोल्हापूरचा नखरा माझा, चालणं ग सातारी
अहो खानदेशी नार लई लई, बाई मी मुलखाची लाजरी

माझा राया गेलाय्‌ दूर, लागे माझ्या जीवाला घोर
जशी पाण्यावीन सुकून जाते, भरलेली बाजरी

ही जखम कुणाला सांगा मी दाखवू, प्रेमानं आता मी कुणावरी रागवू
कुणी मला द्या धीर आता हो, झाले मी बावरी

मी आज सजीन हो सोळा सिणगाराने, अन्‌ घास देईन मी लाजून हो प्रेमाने
आज राया परतून येती, निरोप आलासा घरी

पावना पुन्याचा आलाय्‌ ग,Pavana Punyacha Aalay Ga

पावना पुन्याचा आलाय्‌ ग, बघून येडा झालाय्‌ ग
सोळावं वरीस सरलंय्‌ ग, माझं लगीन नुकतंच ठरलंय्‌ ग

सकाळच्या पारी सांगावा आला, बघायला येतोय्‌ आम्ही मुलीला
तिन्हीसांजंला पावना आला, बाई बघताच त्याला मी वरलंय्‌ ग
माझं लगीन नुकतंच ठरलंय्‌ ग

भरदार छाती रुबाब मोठा, चोरून बघतोय्‌ होईल बोभाटा

अंगावर माझ्या फुटलाय काटा, कळतात बरं का पुरुषाच्या वाटा
कसं काळीज त्याने चोरलंय्‌ ग
माझं लगीन नुकतंच ठरलंय्‌ ग

बघुन मला झाला हा येडा, ठरलाय्‌ अमुचा साखरपुडा
आलाय्‌ स्वप्नी ठसलाय्‌ मनी त्याला इश्काच्या जाळ्यात घेरलंय्‌ ग
माझं लगीन नुकतंच ठरलंय्‌ ग

पाडाला पिकलाय्‌ आंबा,Padala Pikalay Aamba

आला ग बाई आला ग बाई आला ग
आला, आला, आला, आला
पाडाला पिकलाय्‌ आंबा

वास बघुन तुम्ही जाणा वो पाव्हनं
नमुना बघुन तुम्ही जाणा वो पाव्हनं
पाव्हनं जरा थांबा, अरे घे
पाडाला पिकलाय्‌ आंबा

भारानं वाकलंय्‌ झाड
त्याला मी बाई जीवापाड
रात दिन आजवर जपलंय्‌
चोर खडा मारण्या टपलंय्‌
उघड कसं सांगू सांगा
पाडला पिकलाय आंबा

आंब्याचा रंग केशरी
वर लाली शोभे शेंदरी

तोंडाला तुझ्या पाणी सुटं
घेऊन टाक लगी म्हंजी
काळजी मिटं
घुटमळू नको तू बाबा
पाडाला पिकलाय्‌ आंबा

पदरावरती जरतारीचा,Padaravarati Jartaricha

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा

बांधिला सैलसर बुचडा मानेवरी
माळला सुरंगी गजरा ग त्यावरी
मोकळ्या बटा या रुळती भाळावरी
केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा

डोळ्यांत रेखिले काजळ मऊ झोंबते
कानात घातले लोलक मी लोंबते
फिरफिरुनी माझी मी ऐन्याशी थांबते

गोऱ्या भाळी कोरून ल्याले पुनवेचा चांदवा

मज पहावयास येतील ग कोण ते ?
पाहिले काल पण नाव न मी जाणते
परि गुणास त्यांच्या नगरी वाखाणते
नुसती येता सई, उरी या घुमतो ग पारवा

नाचतो डोंबारी रं,Nachato Dombari Ra

ढमाढम ढोल रं झमाझम झांझरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

उद्याच्या पोटाची काळजी कशाला

आभाळ पांघरु दगड उशाला
गाळूनी घाम असा मागूया भाकरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

सोळातली नार मी रंग माझा बैंगणी
उर होई खाली वर सूरत माझी ठेंगणी
जवानीनं तोडली रं रानफूल डोंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

वीसावं वरीस आलंया भराला
भिंगाची चोळी रं दाटते उराला
सोन्याचा माड असा शंभर नंभरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

हातामधी घेतली आडवी चिवाटी
तारेवरी डोलता नाचतो कोल्हाटी
माणसं झाली का रं कावरी बावरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

कोल्हाटी अंगाची वाकली कमान
कोलांटी मारतो गिरक्या घेऊन
करती कवतूक शेजारी-पाजारी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

काठी भली लांबडी दातांनी धरितो
वाऱ्यावर घुमुनी रिंगण घालितो
चढुनी उतरीतो पायरी पायरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

जात अशी रांगडी, भोळी तशी भाबडी
भल्यासंगं भली रं, बुऱ्यासंगं वाकडी
पायाला आमुच्या रं बांधली भिंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी



जागी हो जानकी,Jagi Ho Janaki

नयनकमल हे उघडीत हलके जागी हो जानकी
जागी हो जानकी
उठवाया तुज नभी येतसे हसत उषा प्रिय सखी

जागी हो जानकी

तृणपुष्पांच्या शय्येवरती स्वच्छंदे पहुडसी
वसुंधरेच्या कुशीत शिरुनी स्वप्नीही तरळसी

वृक्षावरती करिती पहाटे पक्षी किलबिल मुखी
जागी हो जानकी

मधुर स्वरांनी गाता सरिता हर्षे भूपाळी
वात्सल्ये तुज धरणीमाता प्रेमे कुरवाळी
येई द्यावया दूध मायेने नंदिनी बघ कौतुकी
जागी हो जानकी

फड सांभाळ तुऱ्याला ग Phad Sambhal Turyala Ga

फड सांभाळ तुऱ्याला ग आला

तुझ्या ऊसाला लागल कोल्हा



मूळ जमीन काळं सोनं

त्यात नामांकित रुजलं बियाणं

तुझा ऊस वाढला जोमानं

घाटाघाटानं उभारी धरली


पेरपेरांत साखर भरली

नाही वाढीस जागा उरली

रंग पानांचा हिरवा ओला



लांब रुंद पिकला बिघा

याची कुठवर ठेवशील निगा ?

सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा

याला कुंपण घालशील किती ?

जात चोरांची लई हिकमती


आपली आपण धरावी भिती

अर्ध्या रात्री घालतील घाला



तुला पदरचे सांगत नाही

काल ऐकू आली कोल्हेकुई

पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही

साऱ्या राती राहील कोण जागं ?

नको बोलण्याचा धरूस राग

बघ चिखलात दिसतात माग


कुणीतरी आला अन्‌ गेला

गळ्यात माझ्या बांधा एक,Galyat Majhya Bandha Ek

लाखामधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं
तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं !

ही ऐन भराची उमर लई मोलाची
ही चिक्कण माती सोन्याच्या तोलाची
अंगामधुनी पिसाट वारं ज्वानीचं भरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !

हे घुंगरू बांधण्या कितीदा खाली वाकू
किती किती लाज मी पदराखाली झाकू
चाळामधुनी वीज पाखरू मनात थरथरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !

दोघांत रंगला नजरबंदीचा खेळ
पर हार जीतीचा बसला नाही मेळ
बक्कळ झाल्या भेटी आता एक काम उरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !



खेळताना रंग बाई होळीचा,Khelatana Rang Bai Holicha

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

आम्ही तरण्या ग पोरी
जमलो गावा बाहेरी
सख्याची आली स्वारी
उडविली ती पिचकारी
घातला ग घेर त्यानं टोळीचा, टोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

झणि पाऊल अवघडलं
आणि काळीज धडधडलं
काय सांगु मी पुढलं
क्षणातच सारं घडलं
जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

मला काहि समजंना
मला काही उमजंना
त्याला कोणी सांगंना
कुणाला तो ऐकंना
डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

कळीदार कपूरी पान,Kalidar Kapuri Paan

कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा

बारीक सुपारी निमचिकनी घालून
जायपत्री वेलची लवंग वरी दाबून
बांधले तसे या कुडीत पंचप्राण
घ्या रंगत करि मर्दुनी, चतुर्दशगुणी, सख्या सजणा

कमरेचा झुलता झोक नूर बिनधोक उरी मावेना
काजळी नजर छिनमिनी चांदणी रैना
छेडिता लालडी मुलाम तुमची गुलाम झाले सजणा
पायी पैंजण छ्न्नक छैना