रचिल्या कुणि या प्रेमकथा,Rachilya Kuni Ya Premkatha

रचिल्या कुणि या प्रेमकथा ?

नभि दिवसाचा देव उगवला
धरणीवरी का नवा तजेला
दंव डोळ्यांतिल पार पळाले, त्यागि तिज पाहता
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?

ही चाफ्याची कळी गोरटी
अति लाजवट खुळी पोर ती
कशि उमलली गीत लाडके वाऱ्याचे ऐकता
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?

नवपर्णांनी पूर्ण बहरला
वृक्षराज हा गगना भिडला
तशी तयाला दे आलिंगन कोमल पुष्पलता
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?

No comments:

Post a Comment