Showing posts with label बायकोचा भाऊ (१९६२). Show all posts
Showing posts with label बायकोचा भाऊ (१९६२). Show all posts

सुख येता माझ्या दारी,Sukha Yeta Majhya Dari

सुख येता माझ्या दारी
सुखासवे तो उदया येईल दिनसोन्याचा संसारी

सुवासिनीच्या देहतरूवर हर्ष-फुलांचा फुलता मोहर
गंधवती मी होऊन जाइन सुख देवाला सामोरी

नेत्र शिंपली भरता स्वाती, आनंदाचे झरता मोती
पति प्रेमावर उधळित राहिन, मनोमनी का देव्हारी

अमर सुखाची पडता दृष्टी, उजळुन जाता जीवनसृष्टी
उणे न काही सुखरूप मीही, सर्व सुखाच्या मंदिरी

शिकवितेस तू शिकता,Shikavates Tu Shikata

शिकवितेस तू शिकता शिकता
सहज मजकडे बघता बघता

बघायलाही तुम्ही शिकवीता
सहज मजकडे बघता बघता

तुझी पापणी ती ढळलेली
गूज मनीचे लिहिते गाणी
कळते मजला तुम्ही वाचता
सहज मजकडे बघता बघता

स्पर्श सारखा पुसतो काही
हर्ष मनाचा अबोल राही
परी बोलकी तुझी मुग्धता
सहज मजकडे बघता बघता

करिशी वेणी मागे पुढती
निळी पाखरे नयनी उडती
हसता मजला अर्थ लागता
सहज मजकडे बघता बघता

चंपक गोऱ्या रोमांचातुन
गीत सुगंधी येता बहरून
बावरशी का प्रीत गुंजता
सहज मजकडे बघता बघता

बघा ना छळतो हा,Bagha Na Chalato Ha

बघा ना छळतो हा, छळतो हा वारा असा ?
ओढुनी अंचल हा, अंचल हा पळतो असा !

आळ वृथा का या वाऱ्यावर, वाऱ्याहुन मन चंचल, आवर !
कशी आवरु हलता झुलता, तव नयनांचा आरसा !

इथेच झाले नील जलावर, स्वर्ग धरेचे मीलन सुंदर
प्रतिबिंबाला बिंब पाहता वेडावुनी मज राजसा !

भावमधूर ही फुले मनोहर, बहरून आली पर्णपाचूवर
सहवासाचा सुगंध अपुला परिमळ तो हा गोडसा !

पाहिलेस तू ऐकलेस तू,Pahiles Tu Aikiles Tu

पाहिलेस तू ऐकलेस तू
काय पुन्हा रे सांगू ?
अपराधाविण कठोर शासन कुठवर मी साहू ?

काळजातील धागे तोडून
घरधनी जाता घर हे सोडून
पतिप्रेमाविण कर हे जोडून
काय तुला मागू ?

येऊ नये ती वेळ येऊन
प्रपंच पूजा गेली उधळून
आसवांची माळ ही ओवून
सांग कुणा वाहू ?

गा रे कोकिळा गा,Ga Re Kokila Ga

भूलोकीच्या गंधर्वा तू, अमृत संगीत गा
गा रे कोकिळा गा

सप्तसुरांचा स्वर्ग उभारुन
चराचरांना दे संजीवन
अक्षय फुलवित हे नंदनवन पर्णफुलातुन गा

कुहुकुहु बोलत मधुर गायनी
मोहित होता सारी अवनी
कुसुम-कोमला ही वनरणी नाचत थयथय गा

मन्मथ मनीचा इंद्रधनूला
शर पंचम तो लावुनी आला
प्रीत भेटता अनुरागाला मीलन होऊन गा