सखू आली पंढरपूरा,Sakhu Aali Pandharpura

आलिंगुनी अंगिकारा बाप रखुमाईच्या वरा
सोडूनिया घरदारा,सखू आली पंढरपूरा

अनवाणी पायपिटी किती केली आटाआटी
सगुणरूप भेटीसाठी तोडिल्या मी बंधनगाठी
तुळशीहार घाली कंठी विटुनीया संसारा

संत तुकोबाची वाणी भक्तीची ती शिकवणी
लागता मी तुझ्या भजनी, छळिली ही सुवासिनी
सर्वसाक्षी सर्वज्ञानी, तुला ठावे परमेश्वरा

साऱ्या इंद्रियांचे प्राण डोळियांत व्याकळून
मायबाप तुला शरण मागते मी विनवून
दिला जन्म, देई मरण, लेकिला या विश्वंभरा

No comments:

Post a Comment