सप्तपदी हे रोज चालते,Saptapadi He Roj Chalate

सप्तपदी हे रोज चालते
तुझ्यासवे ते, शतजन्मीचे हो, माझे नाते

हळव्या तुझिया करात देता
करांगुली ही रूप गोजिरी
गोड शिर्शिरी उरात फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळांच्या देठांभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळुनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते

No comments:

Post a Comment