Showing posts with label गृहदेवता (१९५७). Show all posts
Showing posts with label गृहदेवता (१९५७). Show all posts

सांग धावत्या जळा,Sang Dhavatya Jala

सांग धावत्या जळा, तुझ्यापरी ओढ उरी
सांग कुणाची मला ?

लुकलुकणारी नेत्र मासळी
तुझ्या जीवनी कशी हरपली
मोहुनिया तिला धराया, जीव लाविते गळा

हर्ष फुलांचे उधळित झेले
तुझे मनोगत कुठे चालले
या धरतीला कसा लागला, तुझ्या मनाचा लळा

पाणवठी या अशीच सखया
धीवरकन्या करता मृगया
कसा जाहला सांग प्रेमळा, राव शंतनु खुळा

प्रेम करुन मी चुकले,Prem Karun Mi Chukale

मलाहि मुकले, तुलाहि मुकले
प्रेम करुन मी चुकले

मीच लाविल्या वेलीवरचे
मृदुल दलांचे मधुगंधाचे

फुलता फुलता मम प्रणयाचे
फूल अचानक सुकले

धार प्रवाही संगमी तुटली
उगमापासुन सरिता आटली

पाण्याविण ह्या डोहाभवती
मृगजळ घेरून बसले

दोन पाखरे मिळुनी रमता
एकावरती घाव बसता
सुखात दुसरे इतुके कळता
व्याकुळ लोचन हसले

नीज गुणिले नीज लवलाही,Neej Gunile Neej Lavlahi

पुनवेच्या घरी निळी गोजिरी, निजली अंगाई
नीज गुणिले नीज लवलाही

तव नयनीच्या नक्षत्राला दृष्ट व्हायची या चंद्राची
पुष्पदळे ही पापण्यांची, झणि लडिवाळे मिटुनी घेई

लाजविणारी जाईजुईला, करांगुळीची कोमलताही
गोड कहाणी सांगून तीही, अधुनीमधुनी देत जांभई

सर्व सुखांची प्रेमळ जननी, हळूहळू येई निद्रामाई
होऊन आता तुझीच आई, चुंबित राही वत्सलता ही

गोड तुझ्या त्या स्वप्नामधली,God Tujhya Tya Swapna

गोड तुझ्या त्या स्वप्नामधली
दाखव मजला तुझी माऊली

जिने लाविला बाल मनाला
निज मायेचा रोज लळा
तुझ्या करांची वेळोवेळा
गळा गुंफिली माळ सानुली

याच हातानी जिने भरविला
दहिभाताचा अमृत काला
या ओठांनी ओठ पुसता
मकरंदाची शिते चाखिली

जिने घेउनी तुला कुशीला

जीव अपुला सुखविला
सांगणार ना कधी कुणाला
अवसेने पौर्णिमा पाहिली