सांग धावत्या जळा,Sang Dhavatya Jala

सांग धावत्या जळा, तुझ्यापरी ओढ उरी
सांग कुणाची मला ?

लुकलुकणारी नेत्र मासळी
तुझ्या जीवनी कशी हरपली
मोहुनिया तिला धराया, जीव लाविते गळा

हर्ष फुलांचे उधळित झेले
तुझे मनोगत कुठे चालले
या धरतीला कसा लागला, तुझ्या मनाचा लळा

पाणवठी या अशीच सखया
धीवरकन्या करता मृगया
कसा जाहला सांग प्रेमळा, राव शंतनु खुळा

No comments:

Post a Comment