Showing posts with label M-श्रीधर फडके. Show all posts
Showing posts with label M-श्रीधर फडके. Show all posts

झिणि झिणी वाजे ZINI ZINI WAJE

झिणी झिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नविन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अतिलीन

कधी खटका, कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका
घेते फिरत कठीन

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रविण


Lyrics -बा. भ. बोरकर B.B BORAKAR
Music -श्रीधर फडके SHREEDHAR FADAKE
Singer -आशा भोसले, AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -

घन रानी, साजणा GHAN RANI SAJANA

घन रानी, साजणा
मी कशी तुझ्यासवे चुकले वाट रे, सांग ना

भिरभिर वार्‍याची, थरथर पाण्याची
अवखळ सजणी मी, मनभर गाण्याची
तरी बाई सूर नव नवे
सुखद मधूर वाटतात हवे, या मना

मधूमय समय असा, बहरुन कुंज हसे
तरळत गंध नवा, वय ते लावी पिसे
इथे तिथे गोड निळेपण
बावरते मन साद घाली कोण, यौवना

किती अधीर, अधीर भाषा प्रीतीची
मन माझे, मन माझे
मन बोलत नाही ग माझे
किती लाजे, किती लाजे
वेडे लाजरे मन गं माझे
एक शपथ, शपथ त्याला भितीची
हृदया रे, अदया रे, बोल ना


Lyrics -शांता शेळके SHANTA SHELAKE
Music -श्रीधर फडके SHRIDHAR FADAKE
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -गीत GEET

रुतत चालले RUTAT CHALALE

रुतत चालले तिळातिळाने
रुतले तळवे, रुतले पाउल
रुतले पायही उभी तशी मी
बावरलेली, त्या वाळूवर

दिशादिशांची सुटली जाणीव
क्षितिजाचे हो नयनी काजळ
हृद्यापाशी स्वप्ने ताजी
लाट वाळूची अन् ओठावर

येशिल कधीतरी दिसेल तेव्हा
आहात वाळू उन्हाखालती
तुझ्या पावला भेटाया परि
येतील दोनच हिरवी पाती


Lyrics -इंदिरा संत INDIRA SANT
Music - श्रीधर फडके SHREEDHAR FADAKAE
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -साकार गंधार हा SAKAR GANDHAR HA

पाऊस रानात PAUS RANAT



पाऊस रानात ,झाकोळ दिशात
पाऊस रानात ,झाकोळ दिशात
झुकले अंबर खाली

पाऊस रानात ,झाकोळ दिशात
पाऊस रानात ,झाकोळ दिशात
झुकले अंबर खाली

गहिरया डोळ्यात गड़द  आभाळ ,
पाखरे फिरून आली
गहिरया डोळ्यात
गहिरया डोळ्यात गड़द  आभाळ ,
,पाखरे फिरून आली
झुकले अंबर खाली ,पाखरे फिरून आले
पाऊस रानात
पाऊस रानात ,झाकोळ दिशात
झुकले अंबर खाली

चिबंट  झांजर झाहले ,पाखरु  फिरून आले
चिबंट झांजर झाहले ,पाखरु  फिरून आले
पाऊस रानात ,
पाऊस रानात ,झाकोळ दिशात
पाऊस रानात ,झाकोळ दिशात
झुकले अंबर खाली 
थेंबात टपोरया
थेंबात टपोरया ,भिजते धरती
किती ग झाले ग चिंब
सावल्या दाटूल्या ,डोल्यात तिकलेत ,डोहात खेळते बिंब
डोहात खेळते बिंब
क्षितिज झाहले चिंब
व्याकुळ का तर झाले झाले
गंधात हळद न्हाले  न्हाले
पाऊस रानात
पाऊस रानात ,झाकोळ दिशात
पाऊस रानात ,झाकोळ दिशात
झुकले अंबर खाली

काहिली भुहिला पोळे , आसूच शेराट झाले 
मेघात तांडव चाले ,वाणीव वारयाशी खेळे  खेळे  
तापल्या मातीचा 
तापल्या मातीचा दिशात दरवळ बेहोश धावती वाटा
धुसळ प्रकाश ,अथांग हिरवळ
सावळ्या सावळ्या लाटा
सावळ्या सावळ्या लाटा
बेहोश धावती वाटा
किती रंग ओले ओले
गर्द गर्द झाले झाले
किती रंग ओले ओले
गर्द गर्द झाले झाले
पाऊस रानात ,झाकोळ दिशात
पाऊस रानात ,झाकोळ दिशात
झुकले अंबर खाली 

Lyrics -विजय कुवेळकर VIJAY KUVELAKAR
Music -श्रीधर फडके SHRIDHAR FADAKE
Singer -आशा भोसले ,सुरेश वाडेकर AASHA BHOSALE,SURESH WADEKAR
Movie / Natak / Album -घराबाहेर GHARABAHER 

ओलेत्या पानात Ooletya panat

ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची

डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला
वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला
थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले

स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी
राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी
तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले

हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा
शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू
अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले

Lyrics -शांता शेळके,  Shanta Shelke
Music -  श्रीधर फडके,  Shridhar Phadke
Singer -अनुराधा पौडवाल, Anuradha Paudwal
Movie / Natak / Album -Ha Maza Marg Ekala / हा माझा मार्ग एकला

सांज ये गोकुळी,Sanj Ye Gokuli

सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साउली

धूळ उडवीत गाई निघाल्या
श्याम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे, पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राऊळी

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली

माउली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वाऱ्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी

सूर कुठूनसे आले अवचित,Sur Kuthunse Aale Avachit

सूर कुठूनसे आले अवचित पथी जाता जाता
उलगडल्या मानसी दिवाण्या स्वप्नधुंद वाटा

निर्विकार मन होते केवळ
तोच स्वरांचा आला परिमळ
गंधित धूसर जादू घडली क्षणी बघता बघता

रूप स्वरांचे तरल.. अपार्थिव
कणाकणांतुन दुखरे आर्जव
शब्दांपलिकडलेसे काही अस्फुट ये हाता

त्या स्वप्नांच्या वाटेवरती
अकल्पिताच्या गाठी-भेटी
अहेतुकाची प्रसन्न संगत अनाम मधुगीता

सूर भवतीचे सरले, विरले
काळजात पण अक्षय उरले
मनात ओल्या मृदुल स्वरांच्या लाटांवर लाटा

सजणा पुन्हा स्मरशील ना,Sajana Punha Smarshil Na

सजणा पुन्हा स्मरशील ना
साऱ्या खुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना !

चकवून कुणा आले कोण
दिधले प्रिया चुंबनदान
कोणी कुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना !

प्रीतीतले लाख बहाणे
तू मी नवे, खेळ पुराणे
मनमोहना, सजणा पुन्हा स्मरशील ना !

विठ्ठल आवडी प्रेमभावो,Vitthal Aavadi Prembhavo

विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥

तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ॥२॥

म्हणा नरहरी उच्चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार ।
संसार करावया प्रेमभावो ॥३॥

नेणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥

रुपे सुंदर सावळा,Rupe Sundar Savala

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥

रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥

गोधने चारी हती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥

एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

तुझ्या पापण्यांच्या आत Tuzya Papnyanchya Aat


तुझ्या पापण्यांच्या आत काय साठले, दाटले ?
दोन ओठांच्या दलांत दंव कोणते गोठले ?

उपचाराचे बोलणे मध्ये तुटून थांबले
क्षण अशब्द रिकामे, युगाप्रमाणे लांबले
नेत्र मिळाले नेत्रांस, नीट केलेस कुंतल
जरा कापत्या करांनी घेसी ओढून अंचल

गोंधळल्या गालांवरी स्मित उमले अधुरे
शब्द डोकावती काही ओठांमधून घाबरे
उभे संकोचाच्या आड, त्याची दिसली सावली
लाल रंगत उषेची मेघांमध्ये न मावली
नको सांगुस कधिही, काय सांगायाचे आहे
अशा भावमोहनाचा अंत अक्षरात राहे

Lyrics - Kusumagraj
गीत    -    कुसुमाग्रज
Music - Shridhar Phadake
संगीत     -     श्रीधर फडके
Singer - Shridhar Phadke
स्वर    -     श्रीधर फडके
Album - Lilav
अल्बम    -    लिलाव

येथोनी आनंदू रे,Yethoni Aanandu Re

येथोनी आनंदू रे आनंदू ।
कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥

महाराजाचे राऊळी ।
वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥

लक्ष्मी चतुर्भुज झाली ।
प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥

एका जनार्दनी नाम ।
पाहता मिळे आत्माराम ॥४॥



मी राधिका मी प्रेमिका,Mi Radhika Mi Premika

मी राधिका मी प्रेमिका
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घन:श्याम
रंगले जयाचे रंगी
मी राधिका मी प्रेमिका

अपरात्री कुंजवनी, सूर मधूर जाग मनी
कळेना, सुचेना, माझी मी उरेना, साहवेना
मीलनासी आतुरले
मी राधिका मी प्रेमिका

श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग
सुखाच्या क्षणीही, मोहुनी वाजे ही मनवीणा
मंत्रमुग्ध मोहरले
मी राधिका मी प्रेमिका

येई भान, तृप्त गात्र, गोकुळी पहाट मात्र
कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी उमजेना
श्यामक्षण जगले
मी राधिका मी प्रेमिका



मी एक तुला फूल दिले,Mi Ek Tula Phool Dile

मी एक तुला फूल दिले सहज नकळता
त्या गंधातून मोहरली माझी कविता

त्या झरणीतुन रुणझुणला शब्द हृदयीचा
त्या शब्दातुन मोहरली माझी कविता

हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातुन मोहरली माझी कविता

का पान-फूल लज्जेने चूर जाहले
का सळसळत्या वाऱ्याचे नूपुर वाजले
त्या नूपुरांचे किण किण किण सूर बहरता
त्या बहरातुन मोहरली माझी कविता

बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी
का शब्द शब्द फुलवितसे काव्य मानसी
ह्या दोन मनी काव्याचा भाव लोटता
त्या भावातून मोहरली माझी कविता

माझ्या मातीचे गायन,Majhya Maticha Gayan

माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे

माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खुलून, कधी पाहशील का रे

माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा, कधी लावशील का रे

माझा रांगडा अंधार, मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या कानी, कधी टिपशील का रे

माझ्या मना लागो छंद,Majhya Mana Lago Chhand

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥

तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥

तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥

गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥



माझिया मना जरा थांब,Majhiya Mana Jara Thamb

माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन्‌ मला वेदना

माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना

माझिया मना, जरा ऐकना
सांजवेळ ही, तुझे चालणे
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पना



मन मनास उमगत नाही,Man Manas Umagat Nahi

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्नातिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?

मन थेंबांचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा-मोहरा ह्याचा
कुणि कधी पाहिला नाही
धनि अस्तित्वाचा तरिही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा
कुणि कसा भरवसा द्यावा ?

भोगले जे दुःख त्याला,Bhogale Je Dukha Tyala

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !



पिवळे तांबुस ऊन कोवळे,Pivale Tambus Oon Kovale

पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे

सोनेरी मखमली रुपेरी पंख कितिकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे

अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती
साळीवर झोपली जणु का पाळण्यात झुलती

झुळकन्‌ सुळकन्‌ इकडून तिकडे किती दुसरी उडती
हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती

पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलिकडिल तो सोन्याचा गोळा