धीर धरि धीर धरी जागृत गिरीधारी
तारितसे भाविकांस तोच चक्रधारी ॥
अढळ पदी अंबरात बसविले धृवाला
संकटात पीतांबर दिला द्रौपदीला
दिधली वैकुंठपेठ सकल गोकुळाला
ऐसा दाता थोर कुंजवन-विहारी ॥
होसी का भयकंपित धरसि का शंका ?
गाजतसे वाजतसे तयाचाच डंका
'जय गोविंद जय मुकुंद जय जय सुखकारी' ॥
खूपच छान गीत !
ReplyDeleteअप्रतिम गायन !!
Khup chhan rachna aani sangit baddhahi
ReplyDelete