तेजोनिधी लोहगोल,Tejonidhi Loh Gol

तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज
हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज

कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परि होऊन अणुरेणु उजळिती
तेजातच जनन मरण, तेजातच नविन साज
हे दिनमणी व्योमराज

ज्योतिर्मय मूर्ती तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा
दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा
होवो जीवन विकास वसुधेची राख लाज
हे दिनमणी व्योमराज

No comments:

Post a Comment