दाटून कंठ येतो,Datun Kanth Yeto

दाटून कंठ येतो ओठांत येइ गाणे
जा आपुल्या घरी तू जा, लाडके, सुखाने !

हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी या गोड आठवाने !

बोलांत बोबडीच्या संगीत जागवीले
लयतालसूरलेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा नाहून अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे !

घेऊ कसा निरोप ? तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे !
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे

No comments:

Post a Comment