फुला फुला रे फुला Phula Phula Re Phula

फुला, फुला रे फुला, फुला

मी लपले, तू शोध मला

गंध कुठे तो शोध फुलादिसत नसे पण सुटला दरवळ

दलात भरल्या लहरी अवखळ

डुले डहाळी जसा झुला
तुझ्या मानसी चाले रुणझुण

तीच सुगंधी माझी गुणगुण

तुझीच प्रीती भुलवी तुलालपसि कुठे तू वाऱ्यापाठी

तुझ्याच हृदयी तुझ्याच ओठी

तुझ्या फुलविते दला, दला

No comments:

Post a Comment