फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा, कुणी तरी माझे बाळ आणा
रेशमाचे कुंची झबले, या हातांनी मी शिवलेले
तसेच हाती राहुन गेले, घालुनी पाहू आता कुणा ?
बाळ निजेची वेळ येते, पाळण्याची दोरी हलते
गहिवरता मी जो जो म्हणते, पाळणा हले सुना सुना
बाळ कुशीला देण्यासाठी, चिमणे चुंबन घेण्यासाठी
जितुके जीवन असेल गाठी, देईन तुजला दयाघना
No comments:
Post a Comment