फूलपाखरू झालो रे मी Phoolpakharu Jhalo Re Mi

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !

फुलाफुलांचे पंख लावुनी बागेमध्ये आलो !मऊ मऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची

धुक्यात फिरता इकडे तिकडे दवबिंदूंनी न्हालो

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !
फुलाफुलावर बसतो मी खुदकन गाली हसतो मी

डोळे मिटुनी थेंब मधाचे मिटक्या मारीत प्यालो

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !नकाच लागू पाठी रे, नका धरु मज हाती रे

कृरपणा हा बघुनी तुमचा मनोमनी भ्यालो

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !