फांद्यांवरी बांधिले ग Phandyavari Bandhile Ga

फांद्यांवरी बांधिले ग, मुलिंनि हिंदोले

पंचमिचा सण आला, डोळे माझे ओले



श्रावणाच्या शिरव्यांनी, आनंदली धराराणी

माझे पण प्राणनाथ, घरी नाही आले



जळ भरे पानोपानी, संतोषली वनराणी


खळाखळा वाहतात, धुंद नदीनाले



पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात

भिजलेल्या चिमणीचे, पंख धन्य झाले



आरशांत माझी मला, पाहू बाई किती वेळा

वळ्‌चणीची पाल काही भलेबुरे बोले

No comments:

Post a Comment