मला हो म्हणतात लवंगि,Mala Ho Mhanatat Lavangi

नाव-गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापुरची
मला हो म्हणतात लवंगि मिरची

हा डौल झोक हा नटारंगीचा ढंग
वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग
हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा, झाकुनी फेकिन नजरेची बरची

हा लाल डाळिंबी शालु पदर जरतारी
ही हिरवी-हिरवी चोळी तंग भरदारी
नका पाहू न्याहाळुन अशी, पडाल तुम्ही फशी, जणु मी नागीन झाडावरची

या तिखटपणावर जाउ नका हुळहुळून
घायाळ शिकारी हरिणी जाइल पळुन
हिरव्या रानात दिसते उठून, नका घेउ खुडुन, अहो मी पाव्हणी बारा घरचीNo comments:

Post a Comment