धनी तुमचा नि माझा
तरुणपणाचं कौतुक म्हणुनी किती नटू मी किती नटू
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू
करा थाट तुम्ही सरदारी
अशी बशीन तुमच्या शेजारी
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू
राजा-राणीला चौकट कसली
मैना राघुच्या पिंजर्यात बसली
मैना गाईल गीत प्रीतिचे पोपट ’विठू विठू’
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू
Lyrics - Jagdish Khebudkar
गीत - जगदीश खेबूडकर
Music - Vasant Pawar
संगीत - वसंत पवार
Singer - Sulochana Chavan
स्वर - सुलोचना चव्हाण
Movie - Rangalya Ratri Asha
चित्रपट - रंगल्या रात्री अशा
No comments:
Post a Comment