राजसा घ्यावा गोविंद विडा,Rajasa Ghyava Govind Vida

ही नव्या नवतीची खुडून कवळी पानं
लावला ज्वानीचा चुना मधल्या बोटानं
ही चिकणी सुपारी फोडली चिमण्या दातानं
अन्‌ डाव्या डोळ्यानं खुडून घातला;
नजर काताचा हो खडा
राजसा घ्यावा गोविंद विडा

विडा घेऊनी अलगद हाती
हात अदबीनं केला पुढती
हिरवा शालू हिरवी चोळी
भरला हिरवा चुडा

या विड्याचा रंग गुलाबी
धुंद करील ही नशा शराबी
याच नशेचा तुमच्यासाठी
भरून आणला घडा

नाचनाचुनी होता दंग
अर्ध्या रात्री येईल रंग
तुमच्यावरती उधळीन राया
शिणगाराचा सडा

No comments:

Post a Comment