Showing posts with label केला इशारा जाता जाता (१९६५). Show all posts
Showing posts with label केला इशारा जाता जाता (१९६५). Show all posts

राजसा घ्यावा गोविंद विडा,Rajasa Ghyava Govind Vida

ही नव्या नवतीची खुडून कवळी पानं
लावला ज्वानीचा चुना मधल्या बोटानं
ही चिकणी सुपारी फोडली चिमण्या दातानं
अन्‌ डाव्या डोळ्यानं खुडून घातला;
नजर काताचा हो खडा
राजसा घ्यावा गोविंद विडा

विडा घेऊनी अलगद हाती
हात अदबीनं केला पुढती
हिरवा शालू हिरवी चोळी
भरला हिरवा चुडा

या विड्याचा रंग गुलाबी
धुंद करील ही नशा शराबी
याच नशेचा तुमच्यासाठी
भरून आणला घडा

नाचनाचुनी होता दंग
अर्ध्या रात्री येईल रंग
तुमच्यावरती उधळीन राया
शिणगाराचा सडा

नाचतो डोंबारी रं,Nachato Dombari Ra

ढमाढम ढोल रं झमाझम झांझरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

उद्याच्या पोटाची काळजी कशाला

आभाळ पांघरु दगड उशाला
गाळूनी घाम असा मागूया भाकरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

सोळातली नार मी रंग माझा बैंगणी
उर होई खाली वर सूरत माझी ठेंगणी
जवानीनं तोडली रं रानफूल डोंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

वीसावं वरीस आलंया भराला
भिंगाची चोळी रं दाटते उराला
सोन्याचा माड असा शंभर नंभरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

हातामधी घेतली आडवी चिवाटी
तारेवरी डोलता नाचतो कोल्हाटी
माणसं झाली का रं कावरी बावरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

कोल्हाटी अंगाची वाकली कमान
कोलांटी मारतो गिरक्या घेऊन
करती कवतूक शेजारी-पाजारी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

काठी भली लांबडी दातांनी धरितो
वाऱ्यावर घुमुनी रिंगण घालितो
चढुनी उतरीतो पायरी पायरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

जात अशी रांगडी, भोळी तशी भाबडी
भल्यासंगं भली रं, बुऱ्यासंगं वाकडी
पायाला आमुच्या रं बांधली भिंगरी
नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी



गळ्यात माझ्या बांधा एक,Galyat Majhya Bandha Ek

लाखामधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं
तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं !

ही ऐन भराची उमर लई मोलाची
ही चिक्कण माती सोन्याच्या तोलाची
अंगामधुनी पिसाट वारं ज्वानीचं भरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !

हे घुंगरू बांधण्या कितीदा खाली वाकू
किती किती लाज मी पदराखाली झाकू
चाळामधुनी वीज पाखरू मनात थरथरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !

दोघांत रंगला नजरबंदीचा खेळ
पर हार जीतीचा बसला नाही मेळ
बक्कळ झाल्या भेटी आता एक काम उरलं
सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !