पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा
बांधिला सैलसर बुचडा मानेवरी
माळला सुरंगी गजरा ग त्यावरी
मोकळ्या बटा या रुळती भाळावरी
केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
डोळ्यांत रेखिले काजळ मऊ झोंबते
कानात घातले लोलक मी लोंबते
फिरफिरुनी माझी मी ऐन्याशी थांबते
गोऱ्या भाळी कोरून ल्याले पुनवेचा चांदवा
मज पहावयास येतील ग कोण ते ?
पाहिले काल पण नाव न मी जाणते
परि गुणास त्यांच्या नगरी वाखाणते
नुसती येता सई, उरी या घुमतो ग पारवा
No comments:
Post a Comment