रुपे श्यामसुंदर निलोत्पल,Rupe ShyamSundar Nilotpal

रुपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा ।
सखीये स्वप्नी शोभा देखियेला ॥१॥

शंखचक्र गदा शोभती चहुकरी ।
सखीये गरुडावरी देखियेला ॥२॥

पितांबर कटी दिव्य चंदन उटी ।
सखीये जगजेठी देखियेला ॥३॥

विचारता मानसी नये जो व्यक्तीसी ।
नामा केशवेसी लुब्धोनी गेला ॥४॥

No comments:

Post a Comment