विठुमाऊली तू माऊली जगाची,Vithu Mauli Tu Mauli Jagachi

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

11 comments:

 1. खूप सुंदर भजन आहे

  ReplyDelete
 2. धुंद होण्यासारखे भजन.

  ReplyDelete
 3. Sachin sudhakar Jadhav24 February 2023 at 20:19

  Motivational and inspire how to Life work

  ReplyDelete
 4. ll जय हरि विठ्ठल ll

  ReplyDelete
 5. खूपच सुंदर भजन आहे.....

  ReplyDelete
 6. || जय हरी विठ्ठल ||

  ReplyDelete
 7. 🙏🙏🙏🙏

  ReplyDelete
 8. खरच अतिशय सुंदर अभंग आहे हा

  ReplyDelete
 9. This song lives in my heart ❤️❤️

  ReplyDelete