स्पर्ष सांगेल सारी कहाणी
शब्द बोलू नकोस आज राणी
संथ सागराच्या लाटा किनाऱ्यास येती
फेनफुले वाळुवरती अंथरून जाती
धुंद हृदयातुनी ही आर्त गाणी
हात गुंफिलेले हाती, फुले लाज गाली
मुक्या भावनांना का ही नवी जाग आली
जन्मजन्मांतरीची ही विराणी
शब्द बोलू नकोस आज राणी
संथ सागराच्या लाटा किनाऱ्यास येती
फेनफुले वाळुवरती अंथरून जाती
धुंद हृदयातुनी ही आर्त गाणी
हात गुंफिलेले हाती, फुले लाज गाली
मुक्या भावनांना का ही नवी जाग आली
जन्मजन्मांतरीची ही विराणी
No comments:
Post a Comment