शोधितो राधेला श्रीहरी,Shodhito Radhela Shrihari

शारद पुनवा, शांत चांदणे कालिंदीच्या तटी
गोपी जमल्या, रास रंगला कदंबतरूतळवटी

दिसेना सखी लाडकी परि
शोधितो राधेला श्रीहरी !

इथे पाहतो, तिथे पाहतो
मधेच थबकून उभा राहतो
बासरी मुकीच ओठांवरी
शोधितो राधेला श्रीहरी !

दरवळलेल्या कुंजानिकटी
इथेच ठरल्या होत्या भेटी
कशी ती वेळा टळली तरी
शोधितो राधेला श्रीहरी !

काय वाजले प्रिय ते पाउल
तो तर वारा तिची न चाहुल
भास हो फसवा वरचेवरी
शोधितो राधेला श्रीहरी !

No comments:

Post a Comment