Showing posts with label अवधूत गुप्ते. Show all posts
Showing posts with label अवधूत गुप्ते. Show all posts

आम्ही नाही जा AMHI NAHI JA



अंग थरथरल ग नजरेंन  बाई
पाहुन्  तुमची नजर साधी नाही
अंग थरथरल ग नजरेंन  बाई
पाहुन् तुमची नजर साधी नाही
अंग थरथरल ग नजरेंन  बाई 
पाहुन् तुमची नजर साधी नाही
अस इथ तिथ बघन्  बर हाय का  
अस इथ तिथ बघन्  बर हाय का  
अव बघल कुणीतरी ,पाहुन्  बघल कुणीतरी   
आम्ही नाही जा
अव बघल कुणीतरी ,पाहुन् बघल कुणीतरी   
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, आम्ही नाही आम्ही नाही ,आम्ही नाही जा,
बघल कुणीतरी  आम्ही नाही जा,
चुक नाही माझी पोरी आहे रूप तुज़ तारण  , रूप तुज़ तारण , रूप तुज़ तारण 
तुला करीन रानी भले तू जीव ठेव तारण , जीव ठेव तारण , जीव ठेव तारण 
चुक नाही माझी पोरी आहे रूप तुज़ तारण,
तुला करीन रानी भले  तू जीव ठेव तारण,  जीव ठेव तारण , जीव ठेव तारण 
तुझा भास होतो रानी आणि मन नाच मोरा वाणी  
तुझा भास होतो रानी आणि मन नाच मोरा वाणी  
तुला सांग कस बघु ग मी चोरा वाणी 
तुला सांग कस बघु ग मी चोरा वाणी 
घ्या बाहुत एकदा नि मान वळवा 
चिट्टीत मला उदया  हाल कळवा
घ्या बाहुत एकदा नि मान वळवा
चिट्टीत मला हाल कळवा
रंग बरवरले उरले तर सांगा
रातभर तुम्ही नाही झुरले तर सांगा
रंग बरवरले उरले तर सांगा
रातभर तुम्ही नाही झुरले तर सांगा
अस हित तिथ बघन्  बर नाही  ना
अस हित तिथ बघन् बर नाही  ना
अव बघल कुणीतरी,अव बघल कुणीतरी,दाजी  बघल कुणीतरी,आम्ही नाही जा 
आम्ही नाही जा ,आम्ही नाही जा ,आम्ही नाही ,आम्ही नाही,आम्ही नाही जा
अव बघल कुणीतरी,आम्ही नाही जा
नदीच्या पाण्यावानी,कनसाच्या दान्यावानी 
नदीचा पाण्यावानी, कनसाच्या  दान्यावानी
तुज़ हसण गोड़ पाखराच्या गाण्यावाणी
नदीचा पाण्यावानी,कनसाचा दान्यावानी
पावसाचा थेंबान् शहारतो पान,तस एका नजरेन हरवले भान
पावसाचा थेंबान् शहारतो पान,तस एका नजरेन हरवले भान
अंग दहिवरले तर  झाले  मी वेडी ,ही नजर तुम्ही हटवा कि थोड़ी
अंग दहिवरले तर झाले मी  वेडी ,ही नजर तुम्ही हटवा कि थोड़ी
अस एकटक बघन्  बर नाही ना
अस एकटक बघन्  बर नाही ना
अव बघल कुणीतरी,अव बघल कुणीतरी,राया बघल कुणीतरी,आम्ही नाही जा,
आम्ही नाही जा,आम्ही नाही ,आम्ही नाही,आम्ही नाही जा,
अव बघल कुणीतरी, आम्ही नाही जा,



Lyrics -
Music - सचिन पिळगावकर SACHIN PILGAONKAR
Singer -उर्मिला डांगर,अवधूत गुप्ते  URMILA DANGER, AVDHUT GUPTE.
Movie / Natak / Album -आयड्याची कल्पना  IDEACHI KALPNA

’मी मराठी’ वाहिनी गीत,Mi Marathi' Title Song

उत्तुंग भरारी घेऊ या !

उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
ऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

गणाधीश नाचतो रंगुनी
नवरात्रीची अंबा भवानी
यळकोटाचा भंडार उधळी खंडोबाची आण घेउनी
वारकऱ्यांची सुरेल दिंडी
विठुरायाचे नाम गर्जते
समृद्धीची पावनगंगा भरून येथे नित्य वाहते
मनगटात यश आहे अमुच्या आणि किर्ती ललाटी
मी मराठी ..... मी मराठी .....

अभंग, ओवी, फटका, गवळण, धुंद पवाडा, धुंद लावणी
माय मराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी
ज्ञान-कला-भक्ती-विद्येचे वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते
जिंकू आम्ही आव्हानांना देऊन आव्हाने मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू
जरी रांगडा बाणा अमुचा जीवास जीवही देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ
साधे भोळी दिसतो परी गुण अमुच्या ठायी कोटी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे
तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....