रडतच आलो येताना RADATACH AALO YETANA

रडतच आलो येताना,पण हासत जावे जाताना
अंगावर आसुड विजेचे ,झेलून घेती घन वर्षेचे ,
सार्थक झाले कोसळण्याचे तृपित धरित्री न्हाताना

हासत हासत ज्योती जळाली ,काळोखाची रात्र उजळली ,
पहाट झाली तेव्हा नव्हती ,तेजोमय जग होताना

बीज आतुनी फुटुनी गेले ,वेदनेत या फूल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे मरण झेलूनी घेताना

कुणी दू:खाचा घोट घेतला खोल व्यथेने प्राण पेटला
त्या दू :खाचे झाले गाणे जीव उधळुनी गाताना

Lyrics -मंगेश पडगांवकर  MANGESH PADAGAWAKAR
Music -यशवंत देव YASHAWANT DEV
Singer -अरुण दाते ARUN DATE

No comments:

Post a Comment