आतां देवा ऐसा AATA DEVA AISA

आतां देवा ऐसा करी उपकार

देहाचा विसर पडो माझ्या

तरीच हा जीव सुख पावे माझा

बरवे केशव राजा कळो आले

ठाव देई चित्ता राखे पायांपाशी

सकळ वृत्तीशी अखंडीत

आस भय लाज चिंता काम क्रोध

तोडावा संबध यांचा माझा

मागने हे देवा तुज एक आता

नाम मुखी संत -संग देई

तुका म्हणे नको वरपंग देवा

घेई माझी सेवा भाव -शुद्ध

Lyrics -संत तुकाराम SANT TUKARAM

No comments:

Post a Comment