संतांचिया गांवी प्रेमाचा,Santanchiya Gavi Premacha

संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ ।
नाहीं तळमळ दु:खलेश ॥१॥

तेथें मी राहीन होऊनि याचक ।
घालितील भीक ते चि मज ॥२॥

संताचिया गांवी वसे भांडवल ।
अवघा विठ्ठल धन वित्त ॥३॥

संतांचे भोजन अमृताचे पान ।
करिती कीर्तन सर्वकाळ ॥४॥

संतांचा उदीम उपदेशाची पेठ ।
प्रेमसुख साट घेती देती ॥५॥

तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी ।
म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥६॥

No comments:

Post a Comment