ओंकार प्रधान रूप गणेशाचे OMKAR PRADHAN RUP GANESHACHEओंकार प्रधान रूप गणेशाचे
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान
ओंकार प्रधान रूप गणेशाचे

आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू
आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला
ओंकार प्रधान रूप गणेशाचे

ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न
ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न
तो हा गजानन मायबाप
ओंकार प्रधान रूप गणेशाचे

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासाचिया
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान
ओंकार प्रधान रूप गणेशाचे

Lyrics -संत तुकाराम SANT TUKARAM
Singer -सुमन कल्याणपूर, SUMAN KALYANPUR
Movie / Natak / Album -BHAKTIGEET

No comments:

Post a Comment