मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला स्वीकारावी पूजा आता, उठि उठि गोपाला
पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला
रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यातुन सान पाउली वाजति पैंजण छुन छुनुन छुन छुन कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण एकतानता कुठे लाविते एकतारिची धून निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला
राजद्वारी झडे चौघडा शुभःकाल जाहला सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला वन वेळूंचे वाजवि मुरली, छान सूर लागला