सूर सनईत नादावला
पूर नयनांत या दाटला
सांग विसरू कशी मी तुला
पुण्यवंतापरी या घरी जन्मले
सात जन्मांतले भाग्य जे लाभले
सात या पाउली विस्मरू मी कशी
मूर्त आई तुझी वत्सला ?
सान होते तशी मूक वेडी कळी
अमृताने तुझ्या वाढले मी खुळी
रोमरोमी जयाच्या तुझ्या भावना
गंध विसरेल का गे फुला ?
पूस डोळे नको हुंदके, आसवे
चालले गे जरी मी पतीच्या सवे
माउली तू मला साउली जीवनी
मी तुझी लाडकी प्रेमला !
पूर नयनांत या दाटला
सांग विसरू कशी मी तुला
पुण्यवंतापरी या घरी जन्मले
सात जन्मांतले भाग्य जे लाभले
सात या पाउली विस्मरू मी कशी
मूर्त आई तुझी वत्सला ?
सान होते तशी मूक वेडी कळी
अमृताने तुझ्या वाढले मी खुळी
रोमरोमी जयाच्या तुझ्या भावना
गंध विसरेल का गे फुला ?
पूस डोळे नको हुंदके, आसवे
चालले गे जरी मी पतीच्या सवे
माउली तू मला साउली जीवनी
मी तुझी लाडकी प्रेमला !
No comments:
Post a Comment