चोरीचा मामला,CHORICHA MAMLA


चोरीचा मामला,मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना,करू नको दैना
या इष्काच्या  गोड गोड राती
रात सारी आपुली,घाई नाही चांगली
रात सारी आपुली,घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा  वेळ  बसा जरा तरी सोसा
या प्रीतीच्या, धुंद  धुंद राती
ये ना रानी,तू येना
ना ना राजा ना ना ना
दूर अशी तु राहु नको,प्रीत अधुरी ठेऊ नको
रात नशीली तुही रसीली
मदनाचा सुटलाय वारा
आस जीवाला लाऊ नको
ध्यास असा हा घेऊ नको
प्रेम दीवाना का रे उभा हा,प्रीतीचा लागलाय नारा
ये ना रानी,तू ये ना
ना ना राजा ना ना ना
वेड तुझे हे आहे मला,सांगु मी कशी वेड्या तुला,रंगबसंती मिलन राती
लाजून चुर मी झाले,प्रीत फुला तु लाजु नको
ओढ़ अशी ही धरु नको,धुंद जवानी आज पुरानी
मदहोश जग हे झाले
मी ना राजा तू ये ना
ना ना ना राणी तु येणा
चोरीचा मामला,चोरीचा मामला,
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना,करू नको दैना
या इष्काचा गोड गोड राती
रात सारी आपुली,घाई नाही चांगली
रात सारी आपुली,घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा वेळ  बसा जरा तरी सोसा
या प्रीतीचा धुंद  धुंद राती
ये  ना राणी  तू ये ना
ना ना  राजा  तु येणा।

Lyrics -शांताराम नांदगावकर  Shantaram Nandgavkar
Music -अरुण पौडवाल Arun Paudval
Singer -सचिन, अनुराधा पौडवाल Sachin, Anuradha Paudval
Movie / Natak / Album -  चोरीचा मामला, CHORICHA MAMLA     

No comments:

Post a Comment