Showing posts with label M- अनिल मोहिले. Show all posts
Showing posts with label M- अनिल मोहिले. Show all posts

हे चांदणे HE CHANDANE



हे चांदणे ही चारुता, ही भावभोळी लोचने

मधुचंद्र हा, मधु यामिनी, ही प्रीतीची मधु गुंजने

पानांतुनी हलके फुले कळी कोवळी सुम होऊनी

मधुगंध हा तव प्रीत का ऐसी सुखाची गायने

सुख मोहरे तनु बावरे हळुवार कापे मोहुनी

ये ये अशी या मानसी फुलवीत प्रीती पैंजणे



Lyrics -शांताराम नांदगावकर SHANTARAM NANDGAWAKAR
Music -अनिल मोहिले ANIL MOHILE
Singer -कुंदा भागवत, अरुण दाते ARUN DATE

ओढाळ आकाश ODHAL AAKASH

 ओढाळ आकाश झुरे सांजवेळी, ओळ अंतराळी  झेपावते

खिन्न प्रकाशाची थरारे साउली,डोळ्यांची बाहुली ओलावते
ओढाळ आकाश झुरे सांजवेळी,ओढाळ आकाश

लकाकती जेथे दिवे कापुराचे तले प्रकाशाचे नादावते
ओढाळ आकाश झुरे सांजवेळी,ओढाळ आकाश

ऐलपैल नाही दिशांच्या  प्रवाही,तरी मज काही बोलावते
ओढाळ आकाश झुरे सांजवेळी,ओढाळ आकाश

 Lyrics -प्रवीण दवणे   PRAVIN DAVNE                       
Music - अनिल मोहिले   ANIL MOHILE
Singer - उषा मंगेशकर    USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु BANYABAPU












मी रवि किरनातुन आले रे MI RAVI KIRNATUN AALE RE

मी रविकिरनातुन आले रे
फुलाभोवती गाता गाता
रंग उषेचे ल्याले रे

तृणपात्याच्या करुण झुला रे
झुलते वारया वरती
हळुच होतसे लाट निशेचि
ढळत्या प्राचीवरती 
पहाट होता दवबिंदुचे
प्राक्तन मी झाले रे

कुणी ओतिला गंध जुईचा
माझ्या पंखावरती
मला उमगली तुझी वेदना
आगीहुनहि जळती
कवाड उघडून हसले डोळे
फुंकर मी झाले रे


Lyrics -प्रवीण दवणे  PRAVIN DAVNE
Music -अनिल मोहिले ANIL MOHILE
Singer -उषा मंगेशकर  USHA MAANGESHKAR