हरिनाम मुखी रंगते,Harinaam Mukhi Rangate

हरिनाम मुखी रंगते
एकतारी करी वाजते
विनविते, मी तुला, भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या दंगते

घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा
तूच यदुनाथा सदा असू द्यावा
इतुकचि मागणे तुझ्यापाशी मी मागते

काम-क्रोध-मत्सर कधी ना पाहिले
लोभ-मोह सारे दूर मी सारिले
हरीच्याच चिंतनी जीवनास मी वाहते

No comments:

Post a Comment