हे चांदणे ही चारुता, ही भावभोळी लोचने
मधुचंद्र हा, मधु यामिनी, ही प्रीतीची मधु गुंजने
पानांतुनी हलके फुले कळी कोवळी सुम होऊनी
मधुगंध हा तव प्रीत का ऐसी सुखाची गायने
सुख मोहरे तनु बावरे हळुवार कापे मोहुनी
ये ये अशी या मानसी फुलवीत प्रीती पैंजणे
Lyrics -शांताराम नांदगावकर SHANTARAM NANDGAWAKAR
Music -अनिल मोहिले ANIL MOHILE
Singer -कुंदा भागवत, अरुण दाते ARUN DATE
No comments:
Post a Comment