विसर प्रीत विसर गीत,Visar Preet Visar Geet

विसर प्रीत, विसर गीत, विसर भेट आपुली
यापुढे न चांदरात, यापुढे न सावली

कंठ दाटतो असा शब्दही मुळी न फुटे
काळजात एक एक तंतुही तसाच तुटे
मीच मांडिल्या घरात शून्यता विसावली

शब्द तू दिलास एक राहिलो विसंबुनी
वंचिलेस गे अखेर तूच शपथ मोडुनी
तू उगाच स्वप्नवेल संशयात जाळिली

डोळियांत मी तुझ्या अखेर पाप जाहलो
झेलण्या उरी कलंक एकटाच राहिलो
विश्व मोकळे तुला मला चिताच लाभली

No comments:

Post a Comment