सारी भगवंताची करणी,Sari Bhagavantachi Karani

सारी भगवंताची करणी
अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी

लक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधुनि देतो
गरिबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो
पतिता संगे पतीतपावन चालतसे अनवाणी

समुद्रात जरी अथांग पाणी तहान शमवि श्रावणधार
अन्न ब्रम्ह ते अखंड घेते काळ्या मातीतून अवतार
जगण्यासाठी तरी मानवा लाग प्रभूच्या चरणी

जिथे वाजतो घुंगुरवाळा, बालक होऊन तिथे रांगतो
मायबाप तो सर्व जगाचा आईसाठी जगात येतो
हात जोडुनी देव बोलतो शरण तुला गे जननी

No comments:

Post a Comment