पाखरा, गीत नको गाऊ !
कातरवेळी आतुर जीवा, वेध नको लावू;
पाखरा, गीत नको गाऊ !
शब्दांहुन तव सूर बोलके
कानी येता काळिज चरके
विरहाचे हे मुके हुंदके
सांग कशी साहू ?
पाखरा, गीत नको गाऊ !
रात्रंदिन जो जवळ असावा
आज कुठे तो प्राणविसावा ?
त्या प्रीतीच्या फसव्या गावा
नको पुन्हा नेऊ
पाखरा, गीत नको गाऊ !
No comments:
Post a Comment