निळे गगन निळी धरा निळे निळे पाणी
ही आगळी कहाणी, ही वेगळी कहाणी
माती ही मायमाऊली
गंधाने चिंब नाहली
वारसा तिचा, खरा दास मी तिचा
नाती ही आमुची पुराणी
हिरवळ ही मुक्या मनाची
पांघरते शाल उन्हाची
झाड डोलते, हळू पान बोलते
फांदीवरी कुहूकुहू गाणी
हुंदडती गायवासरे
बागडती चिमण पाखरे
मुलाफुलांची, अशी चिलापिलांची
दुनिया ही भाबडी अडाणी
आनंदी जिणे जगावे
अंतर उजळून निघावे
प्रेम लुटावे, असे गात सुटावे
सोडवीत सुखाची उखाणी
No comments:
Post a Comment