संसार मांडते मी,Sansar Mandate Mi

माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते
संसार मांडते मी, संसार मांडते !

दारी-घरी सुखाची रूपे उभी नटून
मी पाहते तयांना ही लोचने मिटून
माझ्याच सावलीला मी जवळ ओढते !

नाथा तुझी करावी सेवा अनन्यभावे
हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे
लडिवाळ राजसाची मी दृष्ट काढते !

हातात आज माझ्या सौभाग्यदान आले
ठेवू कशी कुठे ग मी बावरून गेले
माझ्या खुळ्या सुखाला मी आज भेटते !

No comments:

Post a Comment