तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी
सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी
पिरतीचा ग तरू वाढं हळू हळू
तहानभूक हरू जीवलगासाठी
चाफ्याचा ग वास अन् पिरतीचा ग ध्यास
लपंल् कसा जरी केली आटाकाटी
इवली इवली छोटी अंगण पुढं-पाठी
बिघाभर रान माझं वढ्याकाठी
तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी
सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी
पिकला हरभरा, गहू तरारला
चिमणा चांद आला माझ्या पोटी
नगं शेहरगाव नगं नाणं-सोनं
देवाघरचं लेणं आम्हासाठी
No comments:
Post a Comment