तुझी प्रीत आज कशी स्मरू,Tujhi Preet Aaj Kashi Smaru

तुझी प्रीत आज कशी स्मरू ?
तुझी प्रीत, प्रीत ना राहिली
तुझे गीत, गीत ना राहिले
का व्यर्थ सूर प्रिया धरू ?

तुझे शब्द ना ते राहिले
नाते कधि ते संपले
उरली अता शोकांतिका
का शोक त्याचा मी करू ?

तुझी साथ साथ ना राहिली
तुझे हात हात ना राहिले
हातांविना मी त्या कशि
रे तोल माझा सावरू ?

होतास तू माझा कधि
होते तुझी मी एकदा
अश्रूत भिजल्या पाकळ्या
मी ओंजळीत कशा धरू ?No comments:

Post a Comment