Showing posts with label मधुचंद्र (१९६७). Show all posts
Showing posts with label मधुचंद्र (१९६७). Show all posts

सुरावटीवर तुझ्या उमटती,Suravativar Tujhya Umatati

सुरावटीवर तुझ्या उमटती, अचूक कशी रे माझी गझले
कशास पुसशी प्रश्न प्रेयसी, तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले

काल रात्री मी जाग जागलो, अवघे जग जरी होते निजले
जागरणाचे कारण राजा, तुला समजले, मला समजले

तीन दिवस ना भेट आपुली, कितीदा माझे डोळे भिजले
आसूमागिल भाव अनामिक, तुला समजले, मला समजले

तुझ्या नि माझ्या मनात राणी, गूज खोलवर एकच रुजले
कुजबूज काही केल्याविन ते, तुला समजले, मला समजले

मनोरथांचा उंच मनोरा, मजल्यावरती चढले मजले
मधुचंद्रास्तव लाभे वास्तू, तुला समजले, मला समजले

मला आणखी तुला आपुले, दोघांचेही भाव उमजले

मधु इथे अन्‌ चंद्र,Madhu Ithe An Chandra

मधु इथे अन्‌ चंद्र तिथे, झुरतो अंधारात
झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात

एक चंद्र अन्‌ अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात
सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात

माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात
संसारा सुरवात, अजब ही मधुचंद्राची रात

किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर, वाऱ्यावरची वरात
वाऱ्यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात



झटकून टाक जीवा,Jhatakun Tak Jeeva

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा
फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा

होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा
अविचार सोड असला कोल्लाळ कल्पनांचा
आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा

पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा

का कालचा उद्याला देसी उगा हवाला
द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला
अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा