Showing posts with label बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७). Show all posts
Showing posts with label बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७). Show all posts

हलके हलके जोजवा,Halake Halake Jojava

हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

सजली ग मऊ मऊ मखमालीची शैय्या
निजली ग बाळाची गोरी गोरी काया
बाळ रुपडे देवाचे, भुलविते लोचना

खेळवा लाडानं गोपा बायांनो
गोविंद घ्या, गोपाळ घ्या, म्हणा सयांनो
नाव ठेवा नवसाचा, हा राजा देखणा

कुर्रर्र करा कानात हळूच भेटा ग
बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग
आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा

संसार मांडते मी,Sansar Mandate Mi

माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते
संसार मांडते मी, संसार मांडते !

दारी-घरी सुखाची रूपे उभी नटून
मी पाहते तयांना ही लोचने मिटून
माझ्याच सावलीला मी जवळ ओढते !

नाथा तुझी करावी सेवा अनन्यभावे
हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे
लडिवाळ राजसाची मी दृष्ट काढते !

हातात आज माझ्या सौभाग्यदान आले
ठेवू कशी कुठे ग मी बावरून गेले
माझ्या खुळ्या सुखाला मी आज भेटते !

धुंदीत गाऊ मस्तीत राहू,Dhundit Gau Mastit Rahu

धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा

थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत साजणी

रुपेरी उन्हांत, धुके दाटलेले
दुधी चांदणे हे, जणु गोठलेले
असा हात हाती, तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा

दंवाने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची, फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी,
अशी मीलनाची आहे रीत साजणी

अशी हिरवळीची शाल पांघरावी
लाली फळांची गाली चढावी
हळूहळू वारा, झंकारि तारा
आळवित प्रीतीचे संगीत साजणा


जळी यौवनाच्या, डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्य काली, नशा आज आली

एकांत झाला, जणू आज पाहुणा