लख लख चंदेरी (१),Lakha Lakha Chanderi (1)

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हा हा !

चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र-तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम, हा हा !

झोत रुपेरी भूमिवरी, गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हा हा !

आनंदून रंगून, विसरून देहभान
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून
एक होऊ या, हा हा !

No comments:

Post a Comment