Showing posts with label S-जयश्री. Show all posts
Showing posts with label S-जयश्री. Show all posts

लख लख चंदेरी (१),Lakha Lakha Chanderi (1)

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हा हा !

चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र-तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम, हा हा !

झोत रुपेरी भूमिवरी, गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हा हा !

आनंदून रंगून, विसरून देहभान
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून
एक होऊ या, हा हा !

राधिका चतुर बोले,Radhika Chatur Bole

राधिका चतुर बोले
तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा

चल प्रीती पंख पसरू
गगनी स्वैर फिरू
गिरीशिखर सागरांना
लंघुनी मेघांना
राधिका चतुर बोले
तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा

न‍उ लाख दिव्य रमणी
मंगलमय गाणी
आळविती गगनी
मधि कांत शांत हसरा
करिती फेर पुरा
ही तेजाची गंगा
चल चल श्रीरंगा
घालु इथे पिंगा
करु प्रेम अमर अपुले
तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा