उर्मिला मी, निरोप तुज देता
जाउ नको वनी या क्षणी, सांगु कसे नाथा ?
पितृवचनी रामामागुनि
चरण चालती निश्चय करुनी
बंधुप्रेम हे गहिवरुनीया, मीच स्वये पाहता
निरोप तुज देता, उर्मिला मी !
रघुवंशातिल ज्या पुरुषाला
देव म्हणोनि मी पुजियला
वीर धनुर्धर त्या वीराची, असता पतिव्रता
निरोप तुज देता, उर्मिला मी !
मुग्ध मनाची वेडी माया
दु:ख झेलुनी झिजते काया
या झिजण्यातच शतजन्मीचे भाग्य मला लाभता
निरोप तुज देता, उर्मिला मी !
No comments:
Post a Comment